Blogs

Shivaji Maharaj – The Great Warrior

॥जय शिवराय ॥

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

पूर्ण नाव –   – शिवाजी शहाजी भोसले / Shivaji Maharaj
जन्म        – १९ फेब्रुवारी, १६३० / फेब्रुवारी, १६२७
जन्मस्थान – शिवनेरी दुर्ग (पुणे)
वडील         – शहाजी भोसले
माता        – जिजाबाई शहाजी भोसले
विवाह      –  सइबाई सोबत

 

♦  छत्रपती शिवाजी महाराज

शिवरायांबद्दल खरं तर लिहिण्या सारखं खूप काही आहे , पण सर्वच जर लिहायचं ठरवलं तर आमच्याकडे वेबसाइटवर काहीच जागा उरणार नाही , इतके थोर राजे भारताला लाभले हे भारताचं नशीब होय .
मूळचे मराठी असणाऱ्या लोकांच्या देव्हाऱ्यात पहिल्या स्थानावर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला हमखास पाहायला मिळतील . एका मराठी माणसाला त्याच्या एकनिष्ठेची आणि धैर्याची जाणीव करून द्यायची असेल तर त्यांच्या समोर शिवरायांचं नाव घ्यावं , मग त्या माणसाचे चेहऱ्यावरचे भाव शिवाजी महाराजांची थोरवी तुम्हाला सांगून जाईल.

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले . त्यांना लहान वयातच स्वराज्याचे महत्व पटवून दिले. त्यांना रामायण आणि भगवद्गीता सारखे धर्मग्रंथ यांचे ज्ञान देऊन त्यांच्यामध्ये कर्तृत्व ,प्रेम, सर्वधर्म समभाव ,धैर्य ,चिकाटी आणि कित्येक गुणांची त्यांच्या व्यक्तित्वामध्ये पेरणी केली.
एक असा श्रेष्ठ राजा जो स्वतःपेक्षा आपल्या प्रजेची जास्त काळजी घेतो , जो अन्याय विरुद्ध गनिमी काव्याने लढा देतो , जो परस्त्री ला आई समान मानतो , जो शक्ती पेक्षा युक्ती ला जास्त प्राधान्य देतो . असा राजा आपले दैवत आहे धन्य झालो मराठी म्हणून जन्मास आलो

 

♦  शिवाजी महाराजांवर चित्रपट

तब्बल २२५ कोटी रुपयांचा चित्रपटात रितेश देशमुख यांनीं काम सुरु केले आहे . या चित्रपटाचा डिफॉल्ट पोस्टर मिळाला आहे बाकी माहिती गुपित ठेवली गेली आहे

 

♦  जगभरात शिवरायांची केलेली वर्णने

 

शिवाजी एक कष्टाळू वृत्तीचा आणि डौलदार शरीर असलेला शूर योद्धा आहे .रेखीव चेहऱ्याचा ,काळेभोर डोळ्यांचा , त्याच्या नजरेच्या कटाक्षाने जणू काही त्याच्या डोळ्यातून ठिणगीच बाहेर येते कि काय इतका तेजस्वी . स्पष्ट आणि अचूक निर्णयक्षमता असलेला शिवाजी होता. 
-कॉस्म दि गार्ड

 

शिवाजी चे डोळे अतिशय तीक्ष्ण आहेत त्यातूनच त्याची बुद्धिमत्ता व्यक्त होते . दिवसातून फक्त एकवेळ जेवण करून सुद्धा त्याचे शरीर उत्कृष्ट आहे.

जीन दि टेवनो

 

 

संस्कृतीचे रक्षण करणे आणि स्वजनांचे कल्याण करणे हीच खरी संपत्ती आहे .म्हणूनच शिवाजी हा जगातील महान राजांपैकी एक आहे 
-(युरोपिअन इतिहासकार) डेनिस किंकेड

 

जगातील सर्वात मोठा योद्धा शिवाजी आहे आणि त्यांचे स्मारक बांधताना मला खूपच आनंद होत आहे 
-प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड

॥जय शिवराय ॥

[yop_poll id=”5″]

9 thoughts on “Shivaji Maharaj – The Great Warrior

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *